top of page
KCPL- दीर्घकालीन गुंतवणूक करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी
आमच्याशी संपर्क साधा
KCPL
एकविसाव्या शतकाची सुरुवात झाली‌ तसं भारतीय अर्थक्षेत्राने वेगाने कात टाकायला सुरुवात केली, असं घडण्यामागची प्रमुख दोन कारणं होती. पहिलं म्हणजे वर्ष 1991 पासून भारताने स्वीकारलेलं ग्लोबलायझेशन आणि दुसरं म्हणजे माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अत्यंत वेगवान सुधारणा. 

त्यामुळे या क्षेत्राला उच्चशिक्षित, अर्थसाक्षर आणि बदलांच्या वेगाशी जुळवून घेऊ शकतील अशा कुशल मनुष्यबळाची नितांत गरज भासायला लागली. नेमकी ही गरज ओळखत अमृत किरपेकर आणि ओंकार किरपेकर या भावंडांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर या क्षेत्राची निवड केली. 

असीत सी. मेहता यांच्या सहकार्याने स्वतंत्र फायनान्शियल अॅडव्हायझर म्हणून अमृत आणि ओंकारने  सुरुवात केली. मध्यमवर्गीय कुटुंबातून आल्यामुळे दोघांनीही व्यवसाय म्हणून हे क्षेत्र निवडणं, हा कमालीचा धाडसी निर्णय होताच आणि मग पुढे अनेक घटनांतून हे ‘धाडस’ तावून सुलाखून निघत राहिलं. 

जसं वर्ष 2004 मध्ये भारतात अनपेक्षित सरकार बदल. वर्ष 2007-08 मध्ये अमेरिकेला दणका देणारा सब प्राइम इश्यू, पाठोपाठ लेहमन ब्रदर्सची दिवाळखोरी. वर्ष 2009 मध्ये भारतीय बाजारपेठ हादरवून टाकणारा सत्यमचा घोटाळा. वर्ष 2011 मध्ये आलेली जागतिक मंदी तर वर्ष 2012 मध्ये भारतातला 2G घोटाळा. वर्ष 2017 मध्ये GST आल्यावर झालेली उलथापालथ आणि वर्ष 2018 मध्ये केली गेलेली नोटबंदी. हे सारं काही कमीच होतं म्हणून वर्ष 2020 मध्ये कोविडने बाजारपेठेला हादरवून टाकलं. त्यानंतरच्या रशिया-युक्रेनचे युद्धाचे आणि इस्राईल-हमास संघर्षाचे खोलवर पडसाद जगभरातील सर्व बाजारपेठात उमटले.     

      

अर्थात या अशा घटनांमुळे, जागतिक घडामोडींचा गुंतवणुकीवर होणारा परिणाम अभ्यासण्याचं आणि त्यानुसार निर्णय घेण्याचं KCPLचं तंत्र विकसित झालं. दीर्घकालीन गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवून कोणत्याही ‘शॉर्ट टर्म’ प्रलोभनांना बळी न पडण्याचं आमचं अर्थात KCPL चं सूत्र आहे. त्याचा उपयोग आमच्याशी निगडीत असणाऱ्या हजारो गुंतवणूकदारांना झाला आहे.  

आज ‘आम्ही कोण आहोत?’ हे अगदी एका वाक्यात सांगायचं झालं, तर 'KCPL मार्फत केल्या जाणाऱ्या प्रत्येक गुंतवणुकीच्या प्रवासातील आम्ही सहप्रवासी आहोत'.

amrun&omkar.jpg
bottom of page